शंभू चरित्र भाग २६

                                                  शंभू चरित्र भाग २६

                वर्ष झालं, दीड वर्ष झालं, दोन वर्ष
झाली. औरंगजेबानं
शहाबुद्दीनला विचारलं, "तुम्हारा एक
दिनं कितनें बरसों का होता है?"...अरे!
एक दिवसात
किल्ला घेतो म्हणालेला दोन वर्ष
झाली,"आओ वापस!",
शहाबुद्दीनला माघारी बोलवलं
आणि पाठवला 'फ़तेह्खान'.
"फ़तेह्खान" तुम्हारे नाम में हि फ़ते हैं!
हमें फ़ते चाहिए!" वीस हजाराची फौज
घेऊन आला, त्या "रामसेज"
ला चिकटला,
गोचीडीसारखा चिकटला, झुंजत
राहिला, लढत राहिला. पण! मराठे
टक्करां देत राहिले. अरे! टाप
नाही मराठ्यांशी झुंजायचं, अजीबात
नाही. तसूभरं पुढं सरकू देईनात.
फ़तेह्खान वैतागला,
संतापला काही काही करता येईना.
अरे! सहाशे
मराठ्यांनी सळो कि पळो करून
सोडलं.
त्या फतेह्खानला काही कळेना,
शेवटी एक मांत्रिक त्याच्याकडं
आला, म्हणाला..."हुजूरं! मी भूतं वश
करायच्या कामात तरबेज आहे.
मला फक्तं एक सोन्याचा नाग तयारं
करून द्या, नाही तुम्हाला किल्ल्यावरं
घेऊन गेलो तर मग विचारा...!
फतेह्खानानं या मांत्रिकावरं विश्वास
ठेवला, त्याला सोन्याचा नाग तयारं
करून दिला. मांत्रिकानं नाग
छाती जवळ
धरला आणि म्हंटला..."मी पुढं
चालतो तुम्ही मागनं
या...बघा माझी जादू!" मांत्रिक पुढं
निघाला सैन्यं मागं.
फतेहखानला वाटलं आता मराठे
काही नाही करू शकत,
मांत्रिकाची जादू आहे. तो वेस
ओलांडून पुढं आला. मराठे नुसते
बघतायत...एक नाही-दोन नाही येऊ
द्या त्याला. निम्म्यापर्यंत
आला,निम्म्यापर्यंत
जसा आला तशी मांत्रिकाची छाती फुगली..."म्हंटल
ेलो कि नाय घेऊन जातो वरं,
आलो कि नाय
इतवर"...चला पुढं...पुढं-पुढं-पुढं
टप्प्यात आला तसा वरनं
गोफणीचा एक धोंडा असा "घुंग-घुंग-
घुंग" करत
आला त्या मांत्रिकाच्या छाताडावर,
डोळं पांढरं करून मांत्रिक तिथंच
पडला. नाग एकीकडं, मांत्रिक
तिसरीकड, फतेह्खान पळत मागं!
अरे! जिथं माणसं काही करू शकत
नाहीत तिथं भूतं काय करणारं?
मराठ्यांनी फतेह्खानच्या भूतांचाही निकाल लावला.

No comments: