स्मृती मातेच्या
आई म्हणुनी कोणी हाक मारता
या पोरक्या मनात उमाळे दाटतात
तुझ्या आठवणीने कंठ येतो दाटुनी
भेटशील का एकदा तरी या जीवनी
हीच एक आस माझ्या मनी |
तुझ्या मायेची ज्योत मनात उजळते
जसे रात्री उजळतात तारे
आई, सोडून गेलीस तरी
हे मन मानेना बिचारे |
तुझ्या चुंबनात अस साय-साखर
तुझ्याविना जीवनाची होईल कसे अखेर
तुझाच होता या जन्मी आधार
तुझ्याविना दाटला या जीवनी अंधार |
कशी विसरू ग आई, तुझी कारूण्यमूर्ती
तुझ्यापासून मिळत असे मज स्फूर्ती
हृदयाच्या देव्हाऱ्यात, काळजाच्या पाकळीत
ठेवीन जपून तुझ्या त्या स्मृती |
सारथ्य कशासाठी
पुढच पाउल पुढच टाकायचं शिंपले उन्मीलित ते
जीवनाच शिखर चढायच स्वातीच्या जलधारासाठी
उतरायची नाही खोल दरी हृदयकली उमलेली प्रेमाच्या कवडश्यासाठी
लक्ष्य माझ मला गाठायचं | सुनील नयन आसुसलेले
काटेरी रस्त्यावर......दुहेरी वळणावर....... वसंताच्या रंग उधळणीसाठी कुठेच नाही अडायचं चातक प्रतीक्षेत तो
ध्येय माझ मला गाठायचं मेघाच्या एका थेंबासाठी
अंधाऱ्या रात्रीतही चमकायचंय माता धरणी खुललेली
प्रकाशातही तेजस्वी दिसायचं श्रावणाच्या हिरव्या शालीसाठी
ते अढळ धृवपद मिळवायचंय गोंडस चेहरा व्याकूळ तो
म्हणुनी म्हणतो............ मातेच्या चुबनासाठी
फुकटच यश नको आहे गुलाबाकळी मुसमुसलेली
काळावर स्वार व्हायचंय सूर्य किरण मिलनासाठी
तो श्यामकर्ण फेकायचाय हे जीवन आसुसलेले
विजयी घोडदौड करायचीय ' प्रेम' या दोनच अक्षरासाठी.
यश खेचून आणायचय
अन त्यासाठी .....
रथरूपी जीवनाच कृष्णरूपी
सारथ्य करायचय.
No comments:
Post a Comment