स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय

शिवचरित्रमाला संपूर्ण भाग

 

 छत्रपती शिवराय 



sawantarvind.blogspot.com



                                                                           
                   अंधाराच्या चिरत भिंती ,अन्यायाच उतरवत माज ,
                                                                       शिवसुर्य जन्मला ||

                   धरती न्हाली , सृष्टीही चढवीत साज  ,

                    कवने माझ्या राज्याची, जो तो गातो आज , जो तो गातो आज ||

                      जगदंब ! जगदंब ! जगदंब! हे शब्द ऐकल्यावर आपल्या मनाला उभारी येते.डोळ्यासमोर उभी राहते करारी, बाणेदार, जाज्वल्य देशप्रेमाने ओथंबलेली शिवमूर्ती.  पण जगदंब हा शब्दच काय!  देवळातल्या घंटेचा आवाज ऐकायला येणे मुश्कील होते.त्यावेळी सर्व भारत वर्षावर अन्यायी राजवटी होत्या.अशा काळात अनेक मराठा शूर सरदार घराणी या अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटीच्या दावणीला बांधली होती.त्यातलेच एक वेरुळचे आपले वेगळेपण जपणारे भोसले घराणे. मालोजीराजे भोसल्यांच्या कर्तबगारीवर पुणे व सुपे जहागिरी मिळालेली. अशातच मालोजीराजांचे पुत्र शहाजी व  सिंधखेडच्या लखुजी जाधवांची कन्या जिजाऊ यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले.
                   शहाजीराजे भोसले मुळातच शूर आणि कर्तबगार. त्यांच्या मनात नेहमी स्वातंत्र्य भावना उचंबळून यायची. जिजाऊनां तर सुलतानी राजवटीतील अन्याय, मुलीबाळीवरील अत्याचार सहन होत नव्हता. अशा अनेक घटना पाहून त्यांच्या हाताच्या मुठी आपोआप वळायच्या. शहाजीराजे व जिजाऊ इतिहास जाणून होत्या कि, तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी सत्ता संपविणाऱ्या परधर्मी परकीय सत्ताधीशांनी महाराष्ट्रावर पुढे दोन तीनशे वर्षे सत्ता गाजविली. जसजशी त्यांची सत्ता मजबूत होत गेली तसतशी त्यांच्यातली जुलमी प्रवृत्ती वाढीला लागली. आपल्या प्रजेवर अन्यायाचे कर लादणे, त्यांची घरेदारे आणि जमिनी बळकावणे, स्त्रियांची अब्रू लुटणे आणि गुलाम म्हणून प्रजेला राबविणे. असे प्रकार सुरु झाले. सारी मराठीमाणस  या जुलमी सत्तेला विटली होती. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तशी अवस्था झाली होती.
              अशातच तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१
म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०. शिवनेरीच्या माथ्यावर शिवसुर्यजन्मला . राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्याचा उन्मेष बाळगणाऱ्या माता-पित्याच्या पोटी हे शिवरत्न जन्माला आले. शहाजी जिजाऊ यांच्या मनातल्या स्वातंत्र्याची पावले या सह्याद्रीच्या शिवनेरी गडावर रांगू लागली,पळू लागली, हसू लागली. त्या दुडूदुडू धावणाऱ्या पावलांच नाव ठेवलं शिवाजी” .
              शिवाजी नाव जरी घेतलं तरी असंख्य हत्तीच बळ येत. कारण शिवाजी हे नाव उलट बाजून वाचल तर जीवाशी होत.जो आपल्या आयुष्यभर जीवाशी खेळला आणि अन्यायाच्या कळीकाळाशी नडला तो शिवाजी.रयतेशी जिवाशिवाच नात सांगणार नाव शिवाजी. 
                   जिजाऊ या एका कर्तबगार पित्याची कन्या व शूरवीर अशा पतीची पत्नी होत्या. त्यांना अन्यायाची चीड होती. त्यांनी शिवरायांना शस्त्र व शास्त्र कलेत पारंगत केल, त्याचबरोबर राजकारणाचे बाळकडू ही पाजले. लहानपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांना सत्यासाठी आणि न्यायासाठी लढायला शिकवले आणि शेवटी सत्याचाच विजय होतो हे त्यांना पटवून दिले. मोठे होत असताना आई जिजाऊंची हि शिकवण कायम शिवाजी महाराज्यांचा सोबत होती आणि त्याचा प्रभाव शिवाजी महाराजांवर कायम दिसतो.
               शिवाजी महाराजांच्या अंगी मुळातच नेतृत्व, इतरांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता होती. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या फिरून काढल्या आणि आपल्या प्रदेशाबद्दल सर्व माहिती आत्मसात करून घेतली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी काही विश्वासू मावळ्यांना जमवून पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात १६४५ साली स्वराज्य स्थापनेच्या आणाभाका घेतल्या. आपला मुलुख सुराज्यात,स्वराज्यात तबदील करण्याची शपथ घेतली. हेच मावळे त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या प्रवासात त्यांचे सोबती होते. हे मावळे स्वराज्य भावनेने प्रेरित होते आणि स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला हि तयार होते. शिवरायांचा विवाह फलटणच्या निंबाळकर घराण्यातील कन्या सईबाई  यांच्याशी झाला.
                  शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरु झाला. शहाजीराजांनी
शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली होती . ती अशी
         प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णूविश्ववंदिता ||
      शाहुसुनो: शिवस्यैंषा मुद्रा भद्राय राजते ||
      प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. असा अर्थ असणारी राजमुद्रा ही स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता.
                 गनिमी कावा हि पद्धत ज्याला इंग्रजी मध्ये गुरिल्ला वॉर असं म्हणतात हि आजही जगातल्या मोठमोठ्या देशांच्या लष्करामध्ये वापरली जाते. प्रतापगडाच्या घटनेवरून शिवाजी महाराजांची चपळाई, दूरदृष्टी आणि शौर्य दिसून येते. हा एकच प्रसंग
नाही तर असे कितीतरी प्रसंग नियतीने त्यांच्यासमोर उभे टाकले. अशा प्रसंगांना तोंड देण्यास शिवरायाचे अनेक मावळे पुढे सरसावत होते. स्वराज्य ध्येयाने पेटलेली ,वेडी झालेली ही  माणसे जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती देत होती. सय्यद बंडाचा वार झेलणारा जीव महाल , पन्हाळ्यावर हसत हसत शिवराय रुपात मरण पत्करणारा शिवा काशीद , पावनखिंडीत मृत्यूलाही आव्हान देणारा बाजीप्रभू , स्वतःच्या मुलाच लग्न सोडून मृत्यूला मिठी मारणारा तानाजी, अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन पन्हाळा जिंकणारा कोंडाजी फर्जंद , पुरंदरावर दिलेरखानाला सळो कि पळो करणारा मुरारबाजी, महिनोमहिने किल्ला लढविणारा फिरगोजी नरसाळा आणि महाराजांच्या एका इशाऱ्यावर हत्तीशी झुंज देणारा येसाजी कंक . ही माणसे वेडी होती ! खरच वेडी होती स्वराज्यासाठी वेडी होती .        
                चार दशके स्वराज्यासाठी लढल्यांनतर एप्रिल ३, १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले. साऱ्या स्वराज्याला दुख सागरात लोटून गेले.शिवरायांच्या  मृत्यूनंतर  संत रामदास स्वामी म्हणतात,
                                    निश्चयाचा महामेरू | बहुत जनाशी आधारू ||


                त्यांच्या मृत्यूनंतरही मुघलांसोबतची मराठ्यांची लढाई चालूच राहिली. शिवाजी महाराज्यांनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजेंनी स्वराज्याची सूत्रे हातात घेतली.
                         शिवाजी महाराज एक उत्कृष्ट राजा, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते आणि दूरदृष्टी असणारे योद्धा होते. ते जनतेच्या कल्याणासाठी लढत राहिले म्हणूनच त्यांना जाणता राजा संबोधण्यात येते. राजेंबद्दलचा मान आणि आदर आजही लोकांमध्ये दिसून येतो.
        घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती                                                
              तोडून सारे बंध सुखाचे लढलात राजे या मातीसाठी ||
        विसरणार नाही जग तुमच्या कार्याची महती ,
                    तुम्हीच मंदिर आमचे, तुम्हीच आमची मूर्ती ||



 
शिवचरित्रमाला संपूर्ण भाग

No comments: