शंभू चरित्रं भाग ३४

                                                             शंभू चरित्रं भाग ३४


                                   अरे! मोघली छावणीत कल्लोळं...कल्लोळं माजला होता आनंदाचा, आतुरंले होते सारे......
अरे! नऊ वर्ष ज्याने औरंगजेबाच्या दिमाखात सैतानी गोंधळ घातला तो "संभाजी" आहे कसा...? कसा दिसतो...? कसा आहे तो...?...कोणं!..कोणं!..कोणं! अरे! कोणं कुणाच्या झाडांवर!,,,कोणं कुणाच्या घरांवर!,,,कोणं कुणाच्या डोक्यांवर!,,,कोणं कुणाच्या खांद्यांवर! उभा राहून बघत होते..कसा आहे?...कसा आहे?...""संभाजी""
आणि निघालीये धिंड वाजत गाजत!!!
अचानक कुठूनतरी भिरं-भिरंनारा दगडं यायचा...धप्प्प्प्प्! छातीवरं आदळायचा...रक्ताची चिळंकांडी यातनेचा कल्लोळं उठायचा!...कुणीतरी यायचं उंटाची शेपटी पिरगंळायचं!, उंट थय्या!...थय्या! नाचायचा अंगावरचे काटेरी साखळंदंड टोचायचे!,,,बोचायचे!,,,जागोजागी जखमा करायचे!. कुणीतरी यायचं अंगावरं थुंकायचं!...कुणीतरी यायचं एखादं शीवी द्यायचं!...कुणीतरी यायचं तलवारीच्या टोकानं संभाजींच्या अंगावरं रेषा उठवायचं!,,,रेषेबरोबर रक्ताची धारं लागायची...अरे! मातीवरं रक्तं..रक्तं मुद्रा उमटवीत जायंची!...अरे! कुणी सोसलं???
अरे! विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाट्याला आल्या?......का? अरे! झुकला असता, वाकला असता, नमला असता तरं ऐश मध्ये जगला असता...मग! का नाही केलं?...का सोसतं राहिला सगळं?...का सहन करत राहिला ही विटंबना?......"स्वराज्यं अस्मितेसाठी"..."स्वराज्यासाठी"..."मराठी दौलतीसाठी"
इतका इतका अनन्विक छळं!...इतके रक्ताळंले होते संभाजी,,,इतके "शेंदूर फासल्या हनुमानासारखे दिसत होते...बस्सं! इतके"...जागा ठेवली न्हवती रे शरीरावरं वारं..वारं करायची......

No comments: