शंभू चरित्र भाग ४०
अखेर! उगवली "फाल्गुनी वद्द्य अमावस्या". "" ११ मार्च १६८९"" औरंगजेबाची अखेरची सजा, "संभाजींच मस्तक कलम करा ".आणि संभाजींच मस्तक छाटल गेल. भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि "गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजीच्या मस्तकाची गुढी उभारली". निघाली वाजत....गाजत! आली " इंद्रायणी - भीमेच्या" तीरावर त्या रेतीत रोवला तोभाल्याचाफाळ आणि मस्तकातन रक्ताचा एक थेंब पडला "इंद्रायणी -भीमेच्या " पात्रात आणि थरारली "इंद्रायणी -भीमा".
अरे !!! याच "इंद्रायणी - भीमेन" पाहिलं होत ते शौर्य , ते धाडस , ते साहस, तो पराक्रम,ती ज्वलाज्वलन तेजसनिष्ठा , ते धैर्य , तो संयम ,मानवीजीवनाच्या चिरंतनतत्वाशी जुळलेल "संभाजींच" ज्ञाननात . ती "इंद्रायणी -भीमा"संभाजीच्या मस्तकाकड .तिरक्या माना करून आसवढाळू लागल्या.
गेली ३५० वर्ष झाली " इंद्रायणी - भीमा अजून रडतेचाय . सांगतेय! खरा "सर्जा संभाजीराज" अजून कळलाच नाही . "शिवाजी महाराजांनी सांगितलं ....कस जागाव !!!आणि संभाजी महाराजांनी दाखवलं ...... कसं मराव !!!......ती "इंद्रायणी -भीमा" आजही सांगतेय.

No comments:
Post a Comment