शंभू चरित्रं भाग ३८

                                                         शंभू चरित्रं भाग ३८


                                   अखेरं "वढबुद्रूकं तुळापूरंच्या वनस्तंभाला" संभाजींना बांधलं गेलं. औरंगजेबानं सुचवलेल्या सजेचा अंमल चालू व्हायचा. आणि बघितलं संभाजींनी आज्ञा आहे डोळे काढायची...""लालबुंद तापलेल्या तप्तं सळ्या"" घेऊन येताना दिसले हाप्शी. धुरांच्या रेषा हवेत सोडतायत सळ्या त्या...अरे! लालबुंद सळ्या...कळूनं चुकलं, डोळे जाणारं आता...संभाजींनी मिटले नेत्रं आणि डोळ्यापुढं उभा राहिले,,,"राजा शिवछत्रपती"..."माँसाहेब जिजाऊ"..."आई सईबाई"..."मावळे"...
"स्वराज्यं"..."गडंकोट"......अरे! याच डोळ्यांनी घेतलं स्वराज्याचं दर्शन,,,याचं डोळ्यांनी केलं इशर्त आपल्या मावळ्यांना,,,याचं डोळ्यांनी पाहिली स्वप्नें स्वराज्यं संवर्धनाची...अरे! याचं डोळ्यांनी घेतलं दर्शन..."आबासाहेबांच"...
"माँसाहेबांच"..."आऊसाहेबांच"...तेचं डोळे आणि उघडले डोळे संभाजींनी,,,डोळ्यापुढं दिसल्या "लालबुंद तप्तं सळ्या"...आल्या सामोरं घुसल्या आत...चर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र,,,,
यातनेचा नुसता कल्लोळं उठला.
सळ्या गेल्या आत...आत...आत निघाल्या त्याचं वेगानं बाहेरं,,,,,,डोळे न्हवते कुठंच उरल्या होत्या नुसत्या खोपन्या...काळ्या कबिंद...उग्रं तर्प बाहेरं फेकणाऱ्या......अरे! पायात काटा घुसला तरं आठ दिवस पाय धरुनं बसतो आम्ही,,,डोळ्यात लालबुंद तप्तं सळ्या गेल्या असतील...किती???...किती??? सोसलं असतील......अरे! किती??? सहन केलं असेल......किती???
अरे!,,,कुणाच्या वाट्याला आलाय हा अन्याय!...कुणी सोसला ह्या यातनांचा जहरी नंगा नाच???......का?......अरे! रगेल असते,,,रंगेल असते तरं झुकले नमले असते ना...कुठून आलं हे आत्मधैर्य???...कुठून आला हा आत्मसंयम???...कुठून आली हि जिगरंरर्रर्र्र्र.....................

No comments: