शंभू चरित्रं भाग ०६

                                                      शंभू चरित्रं भाग ०६

                                    यताकाल संभाजी राजेंचं वयं होतं सतरा वर्ष. महाराष्ट्र एका नव्या जाणीवेच्या आनंदाला आतुरं झाला. रायगड आनंदानं न्हाला होता. कारण होतं "शिवरायांचा राज्याभिषेक". साडेसातशे वर्षापूर्वीचा घनदाट अंधार हटवून राजे "छत्रपती" होणारं होते. "या म्लेंच्छ बादशाहीमध्ये एक 'मराठा' एवढा पतशहा झाला" हि गोष्ट काही साधी झाली नाही. असं सभासदांनी लिहून ठेवलं. तो देखणा सोहळा शिवरायं "छत्रपती" होणारं. पण! त्याचं वेळी काहींनी शिवरायांच्या क्षत्रियत्वावरंच आक्षेप घेतला. शिवरायं क्षत्रीयं नाहीत. सबब! त्यांना राज्याभिषेकाचा अधिकारं नाही. यताकाल "गागाभट्ट" काशीवरून येते झाले आणि त्यांच्या सामोरं बसले. "धर्मपंडित" संभाजी राजेंनी "गागाभट्टाना" पटवून दिलं. गागाभट्टानी संमती दर्शवली आणि रायगडावर राज्याभिषेक झाला. साडेसातशे वर्षापूर्वीचा अंधार हटवला, लोकंशाही राज्यं निर्माण झालं, लोकंकल्याणकारी राज्यं निर्माण झालं, शिवंकल्याणकारी राज्यं निर्माण झालं, शिवशाही अवतरली. रयतेच्या डोळ्यांच्या कडा आनंदानं पाणावल्या. राजा "छत्रपती" झाला. पण! त्याचवेळी इतिहासात आणखी एक घटना घडली, आत्तापर्यंत मराठ्यांची पोरं फक्तं सरदारं पुत्रं होती. "संभाजी राजे पहिले 'छत्रपती' पुत्रं ठरले", "संभाजी राजे पहिले 'युवराज' झाले.
या घटनेपर्यंत संभाजी राजांवर एकही आरोप नाही, एकही डाग नाही. पण! या घटनेनंतर संभाजी राजांच्या चारित्र्याचं पाणी असं काही वेगळ्या पाटेनं वळवून देण्यात आलं कि, मुळचे "संभाजी राजेच" हरवून गेले. 'मल्हारं रामराव चिटणीस' या बखरकारानं आपल्या खापरं पंजोबाला संभाजीनी हत्तीच्या पायी दिलं याचा राग मनात घेऊन "संभाजी राजांचं" अत्यंत विकृत चित्रणं केलं. सभासद बाखरानही तसंच केलं. या दोन बखरींचा आधार घेऊनच मग! पुढचं लेखन झालं आणि "संभाजी राजे" बदनाम होत राहिले. संभाजी राजांवर आत्तापर्यंत ६० नाटकं, आणि २७ चित्रपटं आले. खुद्द दस्तूरं खुद्द शिवरायांवर सुद्धा एवढे झाले नाहीत. आम्हाला चकचकीत जगण्याची सवयं लागलीये. चित्रपट निर्मात्यांनी, नाट्य निर्मात्यांनी, कादंबरीकारांनी, संभाजी राजाचं जगणं वास्तवतेनं न रेखाटता ते अधिक चकचकीत करण्याचा प्रयत्नं केला. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी अशी काय पात्रं आणली गेली "मोरेश्वरं आत्माराम पठारे" यांनी संभाजीवर पाहिलं नाटकं लिहिलं. या नाटकामध्ये त्यांनी तुळसा नावाचं पात्रं आणलं हीच तुळसा बेबंदशाही मध्ये औंधकरांनी आणली पण! नाटकाच्या प्रस्थावनेमध्ये औंधकर असं लिहितात कि या नाटकात योजलेलं "तुळसा" नावाचं पात्रं पूर्णपणे काल्पनिक असून तिचा इतिहासाशी काडीमात्र संबंध नाही. पण! तीन तास नाटकं बघताना आम्हाला प्रस्थावना वाचून दाखवली जात नाही, "तुळसा" खरी का खोटी याचा पत्ता आम्हाला लागतं नाही. पण! तीन तास नाटकात संभाजींबरोबर तुळसा दिसते आणि मग! नाटक संपल्यावर आम्ही म्हणतो, "एवढे आता दोघं तीन तास होते बरोबर म्हटंल्यावर असणार काहीतरी दोघांच.".....उगं दाखवत्यात काय!!!
सत्याच्या तळाशी, वास्तवाच्या मुळाशी आम्ही जात नाही आणि मग एखादं "नाहक व्यक्तीमत्वं" बदनाम होत राहतं हि आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

No comments: