शंभू चरित्र भाग १८

                                                                  शंभू चरित्र भाग १८


                                          तीन वर्ष झाली, साडेतीन वर्ष झाली , चार वर्ष झाली. औरंगजेबाने फतेहखानला सांगितलं."तुम सिर्फ नं के फतेहखान हो.............आव वापस!"...." अब !कौन जाएगा? आणि उभा राहिला कसं खान ....... "हम जायेंगे!".
                                          पुन्हा झुंज चालू, पुन्हा लढाई चालू.....चार वर्ष , पाच वर्ष,सहा वर्ष झाली."रामसेज" अजिंक्यच इहीला. अरे! आपले शिवराय म्हणायचे...."माझा एक किल्ला मावळ्यांनी एक वर्ष लढवला, तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला ३५० वर्ष लागतील". संभाजी राजांनी "रामसेज" नावाचा एकच किल्ला सहावर्ष लढवला , सहा गुणिले साडे तीनशे . औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील?????
                                        
अरे! टाप नाही टाप , वैतागला - संतापला औरंगजेब आणि त्याच रागात डोक्यावरची पगडी काढली....... खाली आपटली , "जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही वा गिरफ्तार करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही"  इथंच महाराष्ट्रात मेला औरंगजेब पण! मरतेवेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी न्हवती.मरेपर्यंत "संभाजी राजाने" त्याला ते भाग्य मिळूच दिल नाही.औरंगजेबाला मराठ्यांना पराभूत करताच आल नाही.
                                         सल...सल....सल.....करत होता औरंगजेब पण! काही काही उपयोग न्हवता. "अरे! औरंगजेब बोलत खूप होता, पण! सांगत काहीच न्हवता..... औरंगजेब चालत खूप होता,पण! पोहोचत कुठंच न्हवता..... औरंगजेब लढाया खूप खेळत होता,पण! जिंकत कुठंच न्हवता."
                                         हि हि सगळी ताकद या सव्वीस वर्षाच्या "संभाजीची", अफाट ताकदीने औरंगजेबाला रोखलं, पुऱ्या दख्खनेमधला एक खण...... एक खण नाही घेऊ दिला त्या औरंगजेबाला आपल्या "सर्जा संभाजीन".    




 

No comments: