शंभू चरित्र भाग १०
"शिवाजीराजे" मोघालांचे किल्ले घेत निघाले असताना, दीलेरंखान काहीच हालचाल करेना म्हणजे त्याचे किल्ले घेत असून सुद्धा दीलेरंखान काही प्रतिकारं करत नाही. त्यामुळे तो मुआजम वैतागला आणि त्यानी दीलेरंखानाला पत्रं लिहिलं..."शिवाजी राजे" आपले किल्ले-किल्ले घेत आहेत, तू गप्प काय बसलाय!!!" तरीसुद्धा हालचाल नाही दीलेरंखानाची. आणि मग! शेवटी औरंगजेबाच पत्रं आलंय...."तू नोकर कुणाचा? माझा कि शिवाजीचा! आणि मग! दीलेरंखानाला हालचाल करणं भाग पडलं. दीलेरंखान पन्हाळ्याला आक्रमणं करायला निघाला आणि मध्ये "आसनी" ला मुक्कमं पडला. "भीमसेन सक्सेना" नावाचा इतिहासकारं लिहितो, ""शिवाजींची माणसं गुप्तंपणे संभाजीराजांकडे येत-जात असतं. एके दिवशी शिवाजी महाराजांच्या माणसांनी संभाजी राजांना बाहेर काढले. विजापुरला मह्सुद्खानाकड़े नेले आणि तिथून मग! संभाजी राजे पन्हाळ्यावरं आले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या माणसांनीच संभाजीराजांना सोडवून नेलंय, आता संभाजी जर फितूरं असते तर शिवरायं त्यांना परत कसे आणतील?. "खंडोजी खोपडा फितूरं झाला, शिवरायांनी त्याचे हात पाय तोडले". "संभाजी कावळी मोघलांना जाऊन मिळाला, प्रतापराव गुजराकर्वी त्याला ठारं मारलं".मग! शिवरायं तो न्याय संभाजीराजांना का लावत नाहीत? साधी गोष्ट आहे हि चाल शिवरायांची आहे. हे जे केलंय संभाजीराजांनी ते शिवरायांच्या इच्छेनुसारच केलंय आणि शिवरायांच्या राजकीय चाली अशाच राहिल्यात. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतेची लुटं करून परत येतात, संभाजींच वाटेत निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजींना सुखरूप घेऊन येतात. आपण अलीकडे म्हणतोच कि आजकालचे राजकारणी बोलतात एक आणि करतात एक. त्याचं राजकारणंच काही काळात नाही. आत्ताच्या राजकारण्यांच राजकराणं आम्हाला कळत नाही मग! ३५० वर्षापूर्वीच्याशिवरायांच राजकारण आम्हाला काय कळणार?
गुप्तं गोष्टी आहेत. गोपनीय भाग आहे. काही लोकं म्हणतात, "पण! आमच्याकडे पत्रं आहेत ना संभाजी राजांनी दीलेरंखानाला पाठवलेली, आम्ही तुमच्याकडे यायला आतूरलोय, आम्हाला तुमच्याकडे घ्या". आता मला एक सांगा हा जरं गुप्तं आणि गोपनीय कटाचा भाग असेल तर संभाजी राजे दीलेरंखानाला असं लिहितील का.....,"राजमान्य राजश्री दीलेरंखान साहेबांशी शीरसाष्टांग दंडवत", त्याचं काय झालं आमचे आबासाहेबं नुकतेचं कर्नाटकंवरनं परत आलेत. आमचं सैन्यं थकलंय, शस्त्रंपण नीट तयार नाहीत त्यामुळे आमचे आबासाहेब म्हंटले, आपण काय आत्ताच दिलेरंखानासोबत लढू शकत नाही, मग! संभाजी राजे करता का असं!!! जाता का दिलेरंखानाकडे जावा जरा वर्ष दीड वर्ष तिथं जाऊन त्यांना गाफील ठेवा, झाली तयारी कि आम्ही तुम्हाला कळवतो मग! या इकडं"...कसा काय वाटतो आमचा कट दिलेरंखान साहेबं तुम्हाला, मग! काय म्हणताय तुम्ही? मग! येऊ का तुमच्याकडं?
अहो! साधी गोष्ट आहे. एवढं पण आपल्याला कळायला नको. एवढचं नाही संभाजी परत आल्यावर शिवरायं त्यांना फ्रेन्चांशी वाटाघाटी करायचे अधिकार देतात. मोघलांच्या विरोधी आक्रमणाची जबाबदारी ते संभाजींवरच सोपवतात. त्यामुळे संभाजीराजे "स्वराज्यद्रोही" नाहीत हि वस्तुस्थिती आहे. हि खरी गोष्ट आहे. संभाजी राजांच्या चारित्र्यावरचे डाग सरळ सरळ आमच्या लक्षात येतात. काही अर्थ नाही त्यात. एक अत्यंत शिवरायांना अपेक्षित असणारा वारसदार या महाराष्ट्राच्यामातीनं महाराष्ट्राला बहाल केलायं. ज्यांनी "स्वराज्य-स्वराज्य" उभं केलयं.

No comments:
Post a Comment