शंभू चरित्रं भाग १६
महिना झाला, दीड महिने झाले, दोन महिने झाले, तीन महिने झाले, चार महिने झाले, पाच महिने झाले. सहाशे मावळे किल्ला अजिंक्य ठेवतायत. अरे! पुढं तसूभरं सरू देईनात. चार्र्फडला, वैतागला शहाबुद्दीन खान. शेवटी डोक्यातनं युक्ती निघाली तोफा मागे घेतल्या तर गोळे पोहोचत नाही ना...आदेश दिला सैन्याला, झाडं तोडा आजूबाजूची सगळ्या जंगलातली, सगळी लाकडं तोडली. दीड-दोन महिने काम चालू आहे.
शहाबुद्दीननं अफ्लात्म किमया केली. किल्ल्याच्या उंचीचा प्रचंड मोठा लाकडी बुरुंजच त्यांनी उभा केला, लाकडी दमदमा...का? तर तोफा आता या लाकडी बुरुंजावर नेउन ठेवायच्यात. किल्ल्याच्या उंची इतक्या, अन तितनं मग! खाली डागायच्या बस्सं!!!
साधी गोष्ट नाही, कौतुकं केलं पाहिजे शहाबुद्दीनचं कौतुकं!!! अरे! किल्ल्याच्या उंची इतका लाकडी बुरुंज आणि तोही केवढा पन्नास तोफा बसतील वरं आणि पाचशे सैनिक उभा राहतील वरं एवढा मोठा बुरुंज. सगळा बुरुंज बांधेपर्यंत मराठे शांत बघत राहिले. बुरुंज उभा राहिला, तोफाही वरं चढविल्या आता उद्या बुरुंजावरुन तोफमारी चालू करायची, किल्ल्यावरं किती दिवस लढतायत बघू?
रात्री सगळे थकले, मोघल शांत पडले आणि मराठे नेमके मध्यरात्री बाहेर पडले. त्या बुरुंजाच्या पुढं आले, दारुगोळा त्या बुरुंजाच्या कडेनी ठासून भरला. पूर्वी हुक्के असायचे हुक्के म्हणजे "गावठी बॉम्ब" हे मराठी हुक्के एका बाजूनी मोघलांना पत्ता लागू नये, मोघल छावणीमध्ये हुक्के टाकत राहिले. मोघलांचा कल्लोळ उडाला आणि तेवढ्या वेळात बुरुंजाभोवती सगळी दारू ठासली. सुरुंग पेरले, वातानी पेटवल्या आणि बघता बघता पेटली..."थुई-थुई-थुई" करत वातान पेटत गेली आणि "धाड्म-धूम" अवघा बुरुंज ढासळला, तोफांसकट खाली. मराठ्यांच्या किल्ल्यावर गोळे पडायच्या आधीच मराठ्यांनी बुरुंजाचाच निकाल लावला.

No comments:
Post a Comment