शंभू चरित्रं भाग २७

                                                     शंभू चरित्रं भाग २७


                                                 न्यायासना पाठीमागं "सिंहासन" आणि सिंहासना पाठीमागं "धर्मासन" उभं राहिल्याशिवाय "राजाची" आणि "राज्याची" प्रगती होत नाही हे संभाजींना माहितीये. आणि संभाजी राजांचा कारभार तसाच आहे. पण! हे फितूरं पुन्हा...पुन्हा औरंगजेबाने फितवले. आता उघड्या मैदानात नाही आता काव्यानेच डाव मांडायचा. संभाजी राजे आहेत तेवढे रायगडावरं. रायगडं म्हणजे "गरुडाच्या बस्खनीसारखा", वाऱ्यालाही जिथं आत शिरता येणारं नाही, आणि आंत शिरलं वारं बाहेरं पडणारं नाही इतका बुलंद आणि बेदाग. या रायगडवरनं संभाजींना पकडनं, हरवन मुश्किल आणि मग! औरंगजेबाने डाव आखला..."संभाजीला रायगडच्या बाहेरं काढा!" आणि फितूरं मदतीला आले. "गणोजी शिर्के" संभाजी राजांचे मेहुणे, वतनाचा न दिल्याचा राग त्यांचा. त्यांचे खटले "कवी कालाशांकडे" होते. "देसाई सावंत" आणि "गणोजी शिर्के" यांचे खटले कवी कलशापुढं आले. या फितुरांनी शिर्केंची समजूत करून दिली कि, "कवी कलश तुमच्या विरोधात" आणि त्या दिवशी कवी कलशांनी नेमका खटल्याचा निकाल सावंतांच्या बाजूनं दिला आणि शिर्केंची खात्री पटली. कवी कलश विरोधकच आणि शिर्के सरळ कवी कलशांवर चालून गेले आणि कवी कलश पळून "खेळण्यावर" म्हणजे "विशाळगडावर" आले. संभाजीराजांना पत्रं लिहिलं. "शिर्केंनी मार दिला......पळून खेळणीयांस आलो!"
संभाजी राजे कडाडले..."नात्याचे पदरं जरं स्वराज्याची कदरं करत नसतील तरं..काय करावं आम्ही?" विचारते झाले येसूबाईना आणि येसूबाई म्हणाल्या..."सौभाग्याला स्वराज्यं आणि स्वराज्याला सौभाग्यं मानतो आम्ही, नात्यांचे पदर जरं स्वराज्याची कदर करत नसतील तरं राजे बिनघोरं निघा...भले ते आमचे बंधू असले म्हणून काय! आणि स्वराज्याची स्वामिनी कडाडली आणि स्वामी निघाला शिर्केंवर, तुटून पडला, शिर्केंच शिरकाण केलं, शिर्के पळून गेले आणि संभाजी राजे पन्हाळ्यावरं आले.

No comments: