शंभू चरित्र भाग २१

                                                            शंभू चरित्र भाग २१ 


                                                        बघता बघता सेतू तयार व्हायला लागला. पण! समुद्राच्या लाटा सेतू बांधू देईनात, लाकडाचे ओंडके किनाऱ्यावर टाकू लागल्या, कापसाच्या गाठी बाहेर फेकू लागल्या. पण! थांबतायत ते "संभाजी राजे" कसले. मोठ्या चिवटपणे काम चालू ठेवलं.

( कधी जंजीऱ्यावर गेलात न तर  "संभाजी राजांनी " समुद्रात बांधलेला तो पूल अजूनही दिसतो.....दिसतो अजूनही)

                                                       दर्या बांधू देईना, पण! संभाजी हटायला तयार न्हवते. सिद्धी खैरतखान,सिद्धी कासमखान पुरते उलथे. पालथे झालेले. आता! संभाजी सोडत नाही आणि  आता जंजिरा जवळजवळ हातात आलाच, मराठ्यांच्या तोफा आग ओकत होत्याच, "लांडा कासम", कलाल बाघडी" या सिद्धीच्या तोफांनी कधीच मना टाकलेल्या. मराठ्यांच्या तोफांची धग त्यांना सोसली नाही. आता जंजिरा हातात येणारच पण! त्याचवेळी औरंगजेबाने जहरी चाल खेळली, "कल्याणाला" हसन अली खान पाठवला आणि हि वार्ता संभाजी राजांना मिळाली....... "कल्याणाला हसन अली खान चालीन आलाय " आणि संभाजींच्या काळजाचा ठोका चुकला. "कल्याण" म्हणजे "स्वराज्य" जंजिरा घ्यायच्या नादात "स्वराज्य"औरंगजेबाच्या घशात जायला नको. संभाजी राजांनी सरळ वेढा दादाजी पंत. वेसाजी पंतांवर सोपवला आणि संभाजी राजे कल्याणाकडे चालते झाले. बघता बघता कल्याणाला पोहचले, हसन खानला तुडव.....तुडव  तुडवला आणि कल्याणावर पुन्हा "भगवा" फडकला.  पण! "जंजिरा" त्यापासून हातातन गेला,तो गेलाच . या घटनेमुळे "जंजिरा'" काही हातात आलाच नाही.   

                                                    पण! सिद्धीवर अशी जरब बसबली संभाजी राजांनी कि, संभाजींच नाव ऐकल तरी जंजीऱ्याच्या काठच दर्याच पाणी चळाचळा कापायच.इतकी अफाट!.....अफाट!  जरब बसवली "सर्जा संभाजी राजांनी "    



 

                                                

No comments: