शंभू चरित्रं भाग ०९

                                                              शंभू चरित्रं भाग ०९


                                      आणखी काही आरोप केले गेले "संभाजी राजांवर". "संभाजी राजे" दीलेरंखानाला जाऊन मिळाले, संभाजीराजे फुटीर, छत्रपतींचा पुत्रं मोघलांना सामील......
नाही, "शिवाजीराजे" कर्नाटकच्या स्वारीवरं निघालेत, सगळं सैन्यं त्यांच्या सोबतं आहे. त्यावेळी बहादूरगडाला दीलेरंखान आलाय, तो स्वराज्यावरं आक्रमणं करायची भीती आहे. महाराजांनी "आदिलशाही" आणि "गोवळकोंड्यात" भांडणं लावून दिलीतं. त्यामुळे ते स्वराज्यावरं आक्रमणं करणारं नाहीतं. पण! दीलेरंखान मोकळा आहे. आपण कर्नाटकात निघाल्यावरं दीलेरंखान आक्रमणं करू नये यासाठी त्याला रोखण्याची जबाबदारी शिवरायांनी "संभाजी राजांना" दिलीये. त्यांना "शृंगारपुरचं" सुभेदारं म्हणून नेमलंय. आणि ससैन्यं शिवरायं बाहेरं असताना निव्वळं बुद्धीच्या बळावरं "संभाजी राजांनी" दीलेरंखानाला रोखलंय,राजे येईपर्यंत रोखलंय. आणि त्यावेळी पत्रंव्यवहारं केलायं..."आम्हाला पराक्रमाची संधी हवीयं, आम्हाला आमचा पराक्रमं दाखवायचायं, इथं स्वराज्यातं ते शक्यं होईना, मला संधी द्यावी!!!". दीलेरंखानाने लगेचं उलट टपाली पत्रं पाठवलं..."अरे! तू तिथं गप्पं काय बसलायं? औरंगजेबाची इच्छा आहे सह्याद्री जिंकायची, तू ये चंल ये माझ्याकडं. आपण दोघं मिळून सगळा दख्खनं जिंकू". संभाजी राजांनी त्याला उलट टपाली कळवलं, "या राज्याची जबाबदारी मझ्यावरं सोपवून माझे वडील परराज्यात गेले आहेत. ते परत येईपर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारुं शकतं नाही". म्हणजे संभाजीराजे येतोही म्हणत नाही आणि संभाजीराजे येत नाही असंही म्हणत नाही. निव्वळं झूलवतं ठेवलंय. राजे परत आले. पन्हाळ्यावर दोघांची चर्चा झाली, बेत झालं आणि मग! राजे रायगडावर गेले. यताकाळं निरोप पाठवू सांगून मध्ये सहा-सात महिने गेले. आता संभाजीराजांना पळूनचं जायचं होतं तर शिवाजी राजे कर्नाटकात असतानाच ते सोपं होतं. आणि मग! एके दिवशी रायगडावरून राजाचं पत्रं येतयं. आपण रायगडास न येता परळीस जाने उचित. आणि मग! संभाजी राजे निघाले तिथून आणि परळीपासून तेरा मैलावरं माहुलीला दीलेरंखानची लोकं आलीत तिथून अवघ्या तेरा मैलावरं जाऊन संभाजीराजे मोघलांना सामील झाले. हा सगळा परिक्रमेचा भाग बघितला तर संभाजी राजांनी पळूनच जावं यासाठी हे जाणीवपूर्वक केलेलं नियोजन आहे. कारण! वस्तूस्थिती ती आहे, शिवाजी राजे कर्नाटकावरून परत आलेत, सैन्यं थकलंय, शस्त्रं मोडलीत, दीलेरंखानाशी लगेच मुकाबला करू शकत नाही यासाठी आणखी काळं दीलेरंखानाला रोखनं गरजेचं आहे म्हणून शिवरायांनी संभाजी राजांना सांगितलंय....""जा त्यांच्याकडं रोखून धरा"" आणि हीच चाल शिवाजीराजांनी आधी एकदा खेळली आग्र्याच्या भेटीवरून परत आल्यावरं. औरंगजेब आता हल्ला करणार हे बघितल्याबरोबर शिवरायांनी पुन्हा माफीचं पत्रं पाठवलंय, "आमच्याकडून चूक झाली, आम्ही तुम्हाला न सांगता आलो...असुद्या! आता माझा पुत्रं पुन्हा मनसबदारं म्हणून घ्या". आणि संभाजींना पुन्हा त्यांनी मुआजमकडं पाठवलंय आणि तेच याहीवेळी केलं संभाजींना त्यांनी पुन्हा दीलेरंखानाकडे पाठवलंय आणि जेवढा काळं संभाजी दीलेरंखानाकडे आहेत तेवढा काळं दीलेरंखानानं एकदाही स्वराज्यावरं हल्ला केला नाही. ""भूपाळगडाचा एकंच किस्सा पण! त्या भूपाळ गडाबद्दल संभाजी राजे बाकरे नावाच्या ब्राम्हणाला दानंपत्रात ते स्वतः लिहितात...."तो दीलेरं भूपाळगडाची इच्छा धरूनं माझ्यासमोरं आला त्यावेळी शंकरासारखा मी माझा तिसरा नेत्रं उभारूनं क्रोधं प्रकटं केला". म्हणजे सरळं आहे संभाजी राजांची इच्छा नाही स्वराज्यावरं आक्रमणं करायची. एवढी एकचं घटना". पण! तोही गड मराठ्यांनी लगेच जिंकून घेतलाय. संभाजीराजे जोपर्यंत दीलेरंखानाकडे आहेत तोपर्यंत दीलेरंखानाने स्वराज्यावरं आक्रमणं केलेलं नाही आणि संभाजींनी ते जाणीवपूर्वक होऊ दिलं नाही. पण! याच काळात शिवाजीराजे मात्रं मोघालांचे किल्ले घेत निघाले.

No comments: